शिवकालीन शस्त्रास्त्रे

शिवसृष्टि    17-Nov-2022
Total Views |

weapon
शिवकालीन शस्त्रास्त्रे
 
आपल्या पूर्वजांचे युद्ध कौशल्य आपल्याला आजही चांगले लढवय्ये बनण्याची प्रेरणा देते. आपण आपल्या पूर्वजांच्या वीर युद्धांच्या कथा ऐकल्या आहेत; परंतु कोणत्या प्रकारची शस्त्रे युद्धात वापरली जात, याची मात्र आपल्याला माहिती नसते.

प्राचीन शस्त्रास्त्रांबद्दल जाणून घेतल्यावर प्रत्येकाच्या मनात कुतूहल निर्माण होते. हे शस्त्र बनवण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर केला गेला , ते कोणत्या उद्देशाने बनवले गेले , याचे संदर्भ काय आहेत हे आपण जाणून घेण्याच्या प्रयत्नात असतो. राजांची शस्त्रे वेगळी, राणीची शस्त्रे वेगळी आणि राजपुत्राची छोटी शस्त्रे वेगळी. याचबरोबर योद्ध्यांकडून वापरण्यात येणारी शस्त्रास्त्रे तुलनेत मजबूत स्वरूपाची आणि पूर्णत: वेगळी असत. नजराणा म्हणून सन्मानपूर्वक दिली जाणारी नक्षीदार शस्त्रास्त्रे वेगळ्या धाटणीची असत. ही सर्व वैविध्यपूर्ण शस्त्रास्त्रे पाहतानाच त्यांच्या अनोख्या इतिहासाचा पट याद्वारे उलगडला जाणार आहे.

मध्ययुगीन काळात जगातल्या प्रमुख पाच शस्त्र परंपरामध्ये भारतीय शस्त्र परंपरा एक होती. भारतीय शस्त्र परंपरेतही राजपूत, मराठा, मोगल, दक्षिणात्य, यांच्या शस्त्रास्त्रांची रचना पूर्णत: वेगळी होती. भारतीय शस्त्र परंपरेतही विविध भारतीय परंपरेतील शस्त्रांची रचना पूर्णपणे भिन्न होती. यावरून तलवारीचे विविध प्रकार आणि त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेता येईल. ही शस्त्रे उच्च दर्जाच्या पोलादाने बनवली होती. ही शस्त्रे सुवर्णयुगाची साक्ष देतात. बाबासाहेब पुरंदरे यांनी भारताच्या कानाकोपऱ्यातून दुर्मिळ शस्त्रे गोळा करून प्रदर्शनाद्वारे लोकांना उपलब्ध करून दिली आहेत. ह्या शास्त्रांचा संग्रह आपल्याला “शिवसृष्टी” येथे पाहण्यात येईल. आपल्या पूर्वजांच्या लढाईचे शास्त्र आणि त्यासाठी वापरली जाणारी शस्त्रे आपल्याला व आपल्या पुढच्या पिढीला पाहायला मिळणार हे आपले भाग्यच.

शिवसृष्टीच्या प्रकल्पामध्ये आपण आपला इतिहास नव्याने अनुभवणार आहोत आणि आज आपण प्रदर्शनात ठेवल्या जाणाऱ्या काही मोजक्या महत्वाच्या तलवारींची माहितीदेखील बघणार आहोत.