किल्ला शिवरायांचा – किल्ले बांधणी स्पर्धा - २०२२

18 Oct 2022 00:00:00
हिंदी    English


 
 
"शिवसृष्टी पुणे" आयोजित
 
किल्ला शिवरायांचा – किल्ले बांधणी स्पर्धा - २०२२
 
संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड – किल्ल्यांचा इतिहास आजच्या पिढीला समजायचा असेल तर त्यांच्या हातात आज मोबाईलऐवजी त्यांना प्रत्यक्ष कार्यातून शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. त्यासाठी दगड – माती, चिखल, काळी – तांबडी माती त्यांच्या हाताला लागली पाहिजे. जवळपासचे गड – किल्ले यांना भेटी देवून त्यांची माहिती घेतली पाहिजे. त्यांना संरक्षित – संवर्धित केले पाहिजे. तरच महाराष्ट्राचे हे वैभव टिकून राहील. हे सारे कृतीतूनच होईल.
या दिवाळीत नव्या कपड्यांसह पर्यावरणपूरक फटाक्यांची आतिषबाजी करत चटकदार - मसालेदार - खमंग फराळाबरोबर गोड – गोड लाडूची मजा घेत...........
 
चला तर मग आहात ना तयार !
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड – किल्ल्यांची प्रतिकृती बनवायला.
 
>> स्पर्धा कालावधी : १८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२२
 
>> स्पर्धेसाठी गट : चार गटात स्पर्धा
 
1.पहिला गट: इयत्ता पाचवी – सहावी
2.दुसरा गट: इयत्ता सातवी – आठवी
3.तिसरा गट: इयत्ता नववी – दहावी
4.चौथा गट: खुला गट
 
स्पर्धेची बक्षिसे : गटानुसार बक्षीस
 
1. प्रथम - सन्मानचिन्ह व रोख रक्कम.
2. द्वितीय - सन्मानचिन्ह व रोख रक्कम.
3. तृतीय - सन्मानचिन्ह व रोख रक्कम.
4. उत्तेजनार्थ -5 - बक्षीस व सहभाग प्रमाणपत्र.
तसेच, विजेत्या आणि उत्तेजनार्थ गटास इतिहास अभ्यासक श्री पांडुरंग बलकवडे यांच्या सानिध्यात "शिवसृष्टी पुणे" येथे विशेष भेट.
 
सहभागी होण्यासाठी सोबत दिलेला गुगल फॉर्म भरून पाठवावा.
https://bit.ly/3TtBy9i 
 
स्पर्धेची नियमावली
 
1. एका गटात कमीत कमी 3 व्यक्ती/मुले/मुली यांचा सहभाग असावा.
 
2. किल्ला हा आपल्या सोयीनुसार घर, सोसायटी, शाळा, कॉलेज इतर ठिकाणी तुम्ही बनवू शकता.
 
3. यापैकी एका किल्याची प्रतिकृती बनवा.
 
a. शिवनेरी
b. रायगड
c. राजगड
d. तोरणा (प्रचंडगड)
e. प्रतापगड
f. लोहगड
 
4. किल्ल्याचे सर्व बाजूंनी काढलेले ३ फोटो आणि साधारणपणे २-३ मिनिटांपर्यंतचा एक माहिती सांगतांनाचा व्हिडीओ.
 व्हिडिओ पाठवतांनी घ्यावयाची काळजी
 
a. व्हिडीओ बनवतांना किल्ला तयार करतांनाचा भाग असावा.
b. किल्ला झाल्यानंतर किल्ल्याची माहिती सांगतांनाचा भाग.
c. निवेदन करतांना आकर्षक पार्श्वसंगीत, पोवाडा, ऐतेहासिक कागदपत्रातील काही समास ओळी काव्य तसेच पारंपरिक वाद्य वाजवून उत्तम करण्याचा विचार करावा.
d. स्पर्धकांनी स्पर्धेपुरता विचार न करता किल्याची ऐतेहासिक बांधणी व किल्ल्यावरील इतिहास, त्यावेळची रणवाद्य, भौगोलिक परिस्थितीचा विचार करून स्पर्धेत परिपूर्ण योगदान द्यावे.
 
5. गुणाचे निकष
 
- निवेदन - १० मार्क
- किल्ल्याची तंतोतंत प्रतिकृती - १० मार्क
- वापरलेले साहित्य (पर्यावरणपूरक) - १० मार्क
- सजावट व किल्ल्यावरील वस्तू - १० मार्क
- अभिमत - १० मार्क
 
6. शक्यतो, किल्ल्यासाठी पर्यावरण पूरक साहित्य वापरावे.
 
7. या स्पर्धेत सहभागी होताना खालील माहिती द्या.
 
- तुमच्या गटाच्या प्रतिनिधीचे नाव आणि संपर्क क्रमांक:
- संपूर्ण पत्ता:
- किल्ला बनवणा-या सहभागी व्यक्ती/मुले/मुली यांची नावे आणि वय:
- किल्ल्याचे नाव:
 
8. वरील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सोबत दिलेला गुगल फॉर्म भरून पाठवावा. 
https://bit.ly/3TtBy9i
 
9. अंतिम निर्णय परीक्षकांचा असेल.
 
नाव नोंदणी मोफत आहे तरी सर्वांनी सहभाग घ्यावा.
 
संपर्क नंबर:- ९७३०६०४११३  
Powered By Sangraha 9.0